महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : सात महिलांना अटक 

कोल्हापूर,दि.6 : सर्वसाधारणपणे जुगार केवळ पुरूषच खेळतात असा समज आहे. अनेक ठिकाणी पोलीस कारवाई करतात. यावेळी पुरुष जुगार खेळताना आढळून येतात. परंतु चक्क महिला जुगार खेळताना पोलिसांनी कारवाई केली आहे. कोल्हापुरात पोलिसांनी एका ठिकाणी टाकलेल्या छाप्यात महिला जुगार खेळत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत सात महिलांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, या महिला सर्व रेकॉर्डवर गुन्हेगार आहे.

महाराष्ट्र टाइम्सने या संदर्भात वृत्त दिले आहे. दरम्यान, या सर्व महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खिशे कापणे, चोरी यासह अनेक गंभीर गुन्हे आहेत. या कारवाईत 38 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

शनिवारी इचलकंरजी आणि जयसिंगपूर परिसरात पोलिसांनी जुगार अड्यावर छापा टाकला होता. यावेळी सात महिला जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यात एका पुरुषालाही अटक करण्यात आली आहे. जयसिंगपूर भागात एका घरात तीन पत्ती जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सात महिलांना अटक करण्यात आली. या सातही महिलांवर खिशे कापणे, चोरीसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहे. या कारवाईमध्ये 38 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मीना काळे, छाया लोंढे, हेमा कसबेकर, वर्षा लोंढे, बेबी शेख आणि ज्योती पाटील अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावं आहे. या सर्व महिला सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी या सातही महिलांवर गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. याआधीही चार महिन्यांपूर्वी जुगार अड्यावर केलेल्या कारवाईत महिलांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही दुसरी घटना समोर आली.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: