पोहरादेवी गडावर जमलेल्या गर्दीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कारवाईचे आदेश , राठोड म्हणतात की..!

शिवसेना नेते संजय राठोड यांनीपोहरादेवी गडावर जाऊन जगदंबा मातेचं दर्शन घेतले. पुण्यात पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर तब्बल १६ दिवसांनी राठोड माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेवर आपले स्पष्टीकरण दिले होते.

मात्र गडावर जमलेल्या गर्दीवरून विरोधकांनी आघाडी सरकारवर तासेच मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली होती. या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्यांच्या या आदेशांवर स्वत: संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावर बोलताना राठोड म्हणाले की, पोहरादेवी गडावर गर्दी झाली. पण मी दर्शनासाठी गेलो होतो. लोकं स्वत: हून तिथे आली. आजूबाजूच्या शहरातील लोकं तिथं आली. मुख्यमंत्र्यांना पूर्ण महाराष्ट्राची चिंता आहे. मी सुद्धा सर्वांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं. सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा असं सांगितलं होतं. पण दहा दिवसांनंतर मी त्यांच्यात गेलो होतो.

या दहा दिवसात ज्याप्रकारे प्रसारमाध्यमं, वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमे यांच्यामध्ये प्रचार झाला होता त्यामुळे स्वत:हून लोकं त्याठिकाणी आले. गर्दीबाबत लोकांना आवाहन केलं होतं. माझं काम सुरु आहे. मी दर्शन करुन आलो आणि जिल्ह्याची आढावा बैठक घेतली”, अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: