PMO कार्यालयाकडून समज मिळताच पुण्यातील मोदी मंदिर हटवलं

 

पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भरती पूजनात पक्षाच्या कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर उभारलं होतं. हे मोदी मंदिर आता हटविण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून समज मिळाल्यानंतर हे मंदिर हटविण्यात आले असल्याची सूत्रांकडून माहिती समोर येत आहे.

या मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा शेजारील नगरसेवकाच्या कार्यालयात हलविण्यात आला आहे. पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले होते. पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहे.

याकरिता १ लाख ६० हजार रुपये खर्च आलेला. १५ ऑगस्ट २०२१ दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते. मंदिराबाहेर असलेल्या, फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख देखील या कवितेच्या आधारे मांडण्यात आली होती. मात्र विरोधकांनी या मोदी मंदिरावरून टीका सुरू केल्यानंतर PMO कार्यालयाने याची दाखल गेट हे मंदिर हटवण्याचे आदेश दिले होते.

Team Global News Marathi: