लस न घेतलेल्यांना पेट्रोल व रेशन नाही, नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश

 

नगर | नगर जिल्ह्यामध्ये नऊ लाखजणांनी अद्यापपर्यंत कोणताच कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतलेला नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन गावा-गावांत त्यामुळे त्यांचा शोध घेऊन गावा-गावांतून त्यांच्या नावांचे फलक लावा तसेच त्यांच्या पेट्रोल, रेशन व अन्य सुविधा तात्काळ रद्द करा, असे आदेश ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले.

करोना संसर्गाचा धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नाही, जानेवारीच्या शेवटी तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, त्याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आली आहे व १०० टक्के लसीकरण गरजेचे आहे. जिल्ह्यातील कर्जत, पारनेर व अकोले या नगर पंचायतींच्या निवडणूक प्रचारानिमित्त सुमारे दीड-दोन महिन्यांनी जिल्ह्यात आलेले पालकमंत्री मुश्रीफ यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे

मुश्रीफ म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत नऊ लाख लोकांनी एकही डोस घेतला नाही तर पाच लाख लोकांनी पहिला डोस घेतला, पण अजून दुसरा डोस घेतला नाही. ज्यांनी अजूनपर्यंत एकही डोस घेतलेला नाही, त्यांच्या संदर्भातल्या ज्या काही नागरी सुविधा आहे, यामध्ये पेट्रोल असो अथवा रेशन व अन्य सुविधा तात्काळ बंद कराव्यात, अशा प्रकारचे निर्देश दिलं आहेत.

तसेच स्थानिक प्रशासनाला त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्या कुणी एकही डोस घेतलेला नाही, अशा व्यक्तींची नावे त्यांच्या गावांमध्येही जाहीर करावीत, अशा प्रकारच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. गावा-गावातून त्यांचा शोध घेऊन त्यांच्याशी डोस घेण्याबाबत संवाद साधावा तसेच त्यांच्या नावांचे फलक गावातून लावण्याचेही आदेश दिल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

Team Global News Marathi: