” प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणारे प्रचारमंत्री शेतकऱ्यांच्या मृत्यूवर गप्प का”?

 

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे हिंसाचार होऊन ९ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश असून चार भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसेच एका पत्रकाराचा समावेश आहे. याप्रकरणी केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाचा सहवास असून १५ जणांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणारे प्रचारमंत्री (पंतप्रधान) आता शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणावर का गप्प बसलेत? ते शेतकऱ्यांचे अन्न नाहीतर, बेईमान लोकांकडून कमीशन खातात का? त्यामुळेच पंतप्रधान काही बोलत नाहीत का?’ असा सवाल कन्हैया कुमारने उपस्थित केला आहे.

या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध नोंदविला जात आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी अद्यापही काही प्रतिक्रिया दिली नाही. यावरूनच नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या तरुण कार्यकर्ता कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.मौर्य यांचा ताफा तिकोनिया चौकातून गेला, तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले.

त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. हे पाहताच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावली. या घटनेत चार शेतकरी मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जाते. तर चार भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय. त्यानंतर केंद्रीय गृहराज्य मंत्री यांच्या मुलासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: