“लोकांना येडं बनवण्याचं काम चालूये”, चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका

 

पुणे | देशभरात जीएसटी कर लागू केल्यानंतर पाच वर्षांसाठी प्रत्येक राज्याला काही ठराविक रक्कम केंद्राकडून देण्यात येते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणारी रक्कम आणखी दोन वर्षे देण्याची मागणी केली होती. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी कोरोनाची दोन वर्षे कठीण गेली असून पाच वर्षांमध्ये अजून दोन वर्षांची वाढ करावी, अशी मागणी केल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं.

त्यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी अजित पवारांना जोरदार टोला लगावत त्यांचा मुद्धा खोडून काढला आहे तुम्ही आता राज्यचं केंद्राला चालवण्यासाठी द्या. 22 राज्यांनी पेट्रोलवरील व्हॅट कमी केल्याचं तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे आता सगळेच मागत असाल तर राज्यचं केंद्राला चालवण्यासाठी द्या, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कोरोना काळात केंद्र सरकारने जीएसटी परिषदेला कर्ज दिलं. त्यानंतर जीएसटी परिषदेकडून राज्यांना थोडेथोडे पैसे देण्यात आले. जीएसटीचे पैसे रात्री 12 वाजताच केंद्राला आणि राज्यांना पाठवले जातात. लोकांना वेडे बनवण्याचं काम चालू आहे, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. आता या टीकेला आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: