पेगाससचा वापर हाच देशद्रोह, राहुल गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका !

 

नवी दिल्ली | देशात फोन टँपिंग प्रकरण चांगलेच गाजत असून याच विरोधकांनी सत्तेत असलेल्या मोदी सरकारला घेरले आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी थेट मोदी सरकरला देशद्रोही म्हणून संबोधले आहे. ते पत्रकार माध्यमांशी बोलताना त्यांनी फोन टँपिंग मुद्द्यावरून ही टीका केली आहे.

ते म्हणाले की हेगगिरीसाठी पेगाससचा वापर हा भारताविरूद्ध देशद्रोह आहे. भारताचे संपूर्ण विरोधीपक्ष येथे उभे आहेत. प्रत्येक पक्षाचे नेते येथे आहेत. संसदेत आमचा आवाज दाबला जात असल्याने आम्हाला आज येथे यावे लागले. ते म्हणले की, आमचा फक्त एकच प्रश्न आहे. भारत सरकारने पेगासस विकत घेतले का, हो किंवा नाही? भारत सरकारने पेगासस शस्त्राचा आपल्या लोकांवर वापर केला?हो किंवा नाही? आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे.

सरकारने म्हटले आहे की संसदेत पेगाससवर कोणतीही चर्चा होणार नाही. स्पष्टपणे सरकारने काहीतरी चुकीचे केले आहे, सरकारने असे काहीतरी केले जे देशासाठी धोकादायक आहे. अन्यथा त्यांनी चर्चा करायचे सांगितले असतील. तसेच अतिरेकी आणि देशद्रोही यांच्याविरूद्ध जे शस्त्र वापरायला हवे, नरेंद्र मोदींनी ते भारतीय संस्था आणि लोकशाहीविरूद्ध का वापरले? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता.

Team Global News Marathi: