मटाराचं या २ सोप्या पद्धतींनी घरच्या-घरी करू शकाल दीर्घकाळ स्टोअर

 

वेगवेगळ्या भाज्यांमध्ये आपण मटार वापरत असतो, त्यामुळे भाज्यांची चव वाढते, मटार खायला जवळपास सर्वांनाच आवडतात. मात्र, हिवाळ्यात मुबलक मिळणारे मटार इतर हंगामात मिळत नाहीत.इतरवेळी आपल्याला मग केमिकलद्वारे प्रिजर्व केलेले मटार मिळतात, जे आरोग्यासाठी घातक असतात.

 

तसेच आपण घरीच वर्षभर पुरतील इतके मटार साठवून ठेवू शकतो. मटार वर्षभर साठवून ठेवण्याचे खूप सोपे उपाय आहेत. तुम्हालाही वर्षभर मटार खायला आवडत असतील तर आम्ही तुम्हाला त्यांची साठवणूक करण्याचे दोन उपाय सांगणार आहोत, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

हिरवे वाटाणे दोन प्रकारे साठवले जाऊ शकतात. एक म्हणजे त्यांना उकडवून साठवणे आणि दुसरा मार्ग म्हणजे ते न उकडता साठवणे. आज आम्ही तुम्हाला मटार घरी दोन्ही प्रकारे कसा साठवायचा त्याविषयी सांगतो. हिरवे वाटाणे कसे साठवायचे

न उकडता असे साठवा मटार दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी शक्यतो पेन्सिल मटार घ्या.कारण ते खाण्यासही अधिक गोड असतात आणि त्याचे दाणे जास्त पिकलेले नसतात. आता मटार जेवढे साठवायचे आहे तेवढे सोलून घ्या आणि मटारचे मोठे दाणे वेगळे करा आणि बारीक-लहान दाणे वेगळे करा.

लक्षात घ्या की, आपण एकदम छोटे दाणे साठवण्यासाठी वापरणार नाही. आता एक टीस्पून मोहरीचे तेल घ्या (एक किलो मटारसाठी सुमारे 1 टीस्पून मोहरीचे तेल वापरले जाते).आता सोललेल्या मटारवर मोहरीचे तेल टाका आणि दोन्ही हातांनी मटारमध्ये चांगले मिसळा. यामुळे फ्रीजरमध्ये ठेवल्यावर मटारांवर बर्फ चिकटणार नाही. मोहरीचे तेल थंडीतही लवकर गोठत नाही, म्हणून त्याचा वापर केला जातो. आता मटार पॉलिथिन पिशव्यांमध्ये भरून रबर बँड लावा.

Team Global News Marathi: