पेट्रोल पंपावर बिल देताना तुम्हाला मोदी सरकारद्वारे करण्यात आलेला महागाईतील विकास दिसेल – राहुल गांधी

नवी दिल्ली | संध्या संपूर्ण देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवलेला असताना दुसरीकडे केंद्र सरकारने इंधन दरवाढ करून सामान्य नागरिकांचे कंबरडं मोडलं आहे. याच पार्श्वभूमीवर मागच्या अनेक दिवसांपासून ट्विटच्या मध्यातून केंद्र सरकारवर टीका करणारे काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी पुन्हा एकदा वाढत्या इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींवरून त्यांनी ‘महागाईचा विकास’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर जोरदार टीका केली. “अनेक राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू होत आहे. पेट्रोल पंपावर बिल देताना तुम्हाला मोदी सरकारद्वारे करण्यात आलेला महागाईतील विकास दिसेल. कर वसुली, महागाईच्या लाटा सातत्यानं येत जात आहेत,” असं राहुल गांधी म्हणाले आहे . आता राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भारतीय जनता पक्ष काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

गेल्या आठवड्यात एक दिवसाआड पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दरवाढ करण्यात आली होती. आता मात्र सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांना झटका दिला आहे. सोमवारी पेट्रोल २८ पैसे, तर डिझेल २७ पैशांनी महाग झाले आहे. वाढलेल्या दरानंतर दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९५.३१ रुपये, तर मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर १०१.५२ रुपये झाला आहे. मागच्या महिन्याभरात सुरू असलेल्या इंधनदरवाढीमुळे ग्राहक आणि मालवाहतूकदारांचे खिशाला कात्री लागली आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव १०१.५२ रुपये झाला आहे. तर, दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९५.३१ रुपये झाला आहे. चेन्नईत एक लिटर पेट्रोलचा भाव ९६.७१ रुपये आहे.

Team Global News Marathi: