पवार माझे बाप म्हणायचं, अशोभनीय वक्तव्यही करायचं चाकणकरांनी लगावला पुन्हा चित्रा वाघ यांना टोला

मुंबई : सीबीआय चौकशीच्या आदेशनानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हाच मुद्दा पकडून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आघाडी सरकारला टोला लगावला होता. आता वाघ यांनी लागलेल्या टोल्याला राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी टोला लगावला आहे.

राजकीय उदरनिर्वाहासाठी बेताल वक्तव्य करणाऱ्या काही लोकांना नवीन वसुलीमंत्री कोण याची काळजी लागली होती. एकीकडे मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत म्हणायचं आणि दुसरीकडे असं अशोभनीय वक्तव्य करायचा दुटप्पीपणा कसा जमत असेल? कर्तव्यनिष्ठ ही दिलीपराव वळसे पाटीलसाहेबांची ओळख आहे.

तसेच कारवाई होऊ नये म्हणून पक्ष बदलणाऱ्या लाचखोरांनी जरी त्यांना आज शुभेच्छा दिल्या असल्या तरी ते अशा गुन्हेगारांना सोडणार नाहीत. गृहमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन.” असा टोला चाकणकर यांनी लगावला होता.

अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली होती. आता प्रश्न उरतो की, नवा वसूली मंत्री कोण? एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली होती.

Team Global News Marathi: