“पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना? नवाब मलिक मधला असू शकतो”

 

दाऊद गँगशी असलेले आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सध्या तुरुंगात असलेले मविआ सरकारचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. विशेष न्यायालयाने नवाब मलिक हे थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. तसेच नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध होते. ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर न्यायालयाने सदरील निरीक्षण नोंदवले. यावरूनच भाजप नेते निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

“पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना? नवाब मलिक मधला असू शकतो. राजकारणात जेव्हापासून आलो तेव्हापासूनचा हा संशय आहे कारण मुंबई बॉम्ब ब्लास्ट घटनेपासून तुम्ही एक वाढीव बॉम्ब ब्लास्ट जाहीर केला तो नेमका कोणाला वाचवण्यासाठी होता? तेव्हा मीडिया वेगळी होती, तुम्ही वाचलात.”, असे ट्वीट करत निलेश राणे यांनी शंका व्यक्त करणारे सवाल उपस्थित केले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार नवाब मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खान यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांनी डी-गँगशी संबंध ठेवून गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच याची दखल घेत न्यायालयाने नवाब मलिक आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी आणि सरदार शाहवली खान यांच्याविरुद्धची कारवाई पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिले असून ईडीने आपल्या चार्टशीटमध्ये नवाब मलिक आणि सरदार शाहवली खान यांना आरोपी ठरवले असल्याचे समोर आले आहे.

Team Global News Marathi: