पवार-मोदी भेटीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची खोचक प्रतिक्रिया |

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात या दोन नेत्यांची भेट झाली. जवळपास १ तासांहून अधिक वेळ त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आहे.

आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मोदी आणि शरद पवार यांच्या बैठका कमी झाल्या होत्या. शरद पवार यांच्या शस्त्रक्रियानंतर या दोन नेत्यांची पहिलीच भेट झाली आहे. या भेटीमध्ये कृषी कायद्यात सुधारणा, सहकार क्षेत्रातील अडचणी आणि नवे सहकार मंत्रालय तसेच बॅंकिंग क्षेत्रासमोरील अडचणी या विषयी चर्चा झाल्याचे वृत्त अमोर येत आहे. मात्र दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे.

या भेटीचा थेट संबंध राज्याच्या राजकारणाशी जोडला आहे. त्यामुळे या भेटीनंतर राज्यातल्या राजकारणाची हवा चांगलीच तापू लागली आहे. आपल्या ट्विटमध्ये अंजली दमानिया म्हणतात, १५ जुलैला फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?), १६ जुलैला फडणवीस दिल्लीला जातात, १७ जुलैला शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही असे ट्विट त्यांनी केले आहे.

Team Global News Marathi: