पवारांना शिवसेना संपवयाची आहे, भाजपाच्या या नेत्याचे वक्त्यव्य….
ग्लोबल न्यूज: महाविकास आघाडी सरकार पडणार असं वक्तव्य भाजप नेते वारंवार करतात. मात्र अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शिवसेना संपवायची आहे, असा दावा भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला आहे त्यामुळे आता या वक्त्यव्यावर सेना आणि राष्ट्रवादित पुन्हा भांडणे लावण्याचा प्रयत्न भाजपा करताना दिसत आहे.
शरद पवार म्हणतात उद्धव टाकरे कॅप्टन आहेत मात्र त्यांना बाहेर फिरू दिलं जात नाही. मात्र ते स्वत: बाहेर फिरताना दिसतात. शिवसेना संपवणे हा त्यामागचा हेतू असल्याचं स्पष्टपणे दिसून येत असल्याचं शिवाजी कर्डिले यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीला कशाप्रकारे ताकद मिळेल याचा प्रयत्नदेखील त्यांच्याकडून सुरु असल्याचं म्हणत कर्डिलेंनी पवारांवर निशाणा साधला.
मूळव्याधाच्या रूग्णांनी या गोष्टी टाळाव्यात,अन्यथा नुकसान होऊ शकते
, ‘महाराष्ट्र सरकार हे कोरोनासारखा आजार आटोक्यात आणण्यात सपशेल अपयशी ठरलं आहे. आजची परिस्थिती पाहिली तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही, औषधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे सर्व सामान्यांना खाजगी दवाखान्यात लाखो रुपये द्यावे लागत आहेत. याला फक्त राज्य सरकार जबाबदार आहे. राज्य सरकार हा कोरोना आजार आटोक्यात आणण्यात अपयशी झाला आहे.’असंही ते म्हणाले.
देवपूजा का आणि कशी करावी ; तुम्हाला माहिती नाही ना ? तर मग जाणून घ्या देवपूजे मागील शास्त्र