पटोलेंचा व्हिडीओ ट्विट करणाऱ्या चित्रा वाघ म्हणतायत की,

 

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काही दिवसांआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडीओ ट्विट केला होता. यावर तुम्ही फॉलोअप घेतला का, असे पत्रकारांनी चित्रा वाघ यांना विचारले असता “मी बॅकफूटवर येण्याचा प्रश्नच नाही, नाना पटोले स्वतः बोलले की मी न्यायालयात जाणार आहे, तर त्यांनी जावं…” अशी प्रतिक्रिया दिली.

राज्यात जम्बो मंत्रिमंडळ नसले तरी कुठलेही काम रखडलेले नाही. मंत्रालयात कामे करून घेण्यासाठी उलट नागरिकांची गर्दी वाढली आहे. प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्देश देऊन त्यांचे प्रश्न सोडवत आहेत.मंत्रालयात काम थांबलेले नाही. अतिवृष्टी झाली तेव्हा दोनही मंत्र्यानी बांधावर जाऊन पाहणी केली, शेतकऱ्यांसोबत चर्चा केली, असेही त्यांनी सांगितले.

भंडारा येथे ३५ वर्षीय महिलेवर झालेल्या पाशवी अत्याचार प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पण पिडीतिने डॉक्टरांकडे सांगितलेल्या माहितीनुसार यात चार आरोपी आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्वरित चौथ्या आरोपीचा शोध घ्यावा व या चारही आरोपींना अत्यंत कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

Team Global News Marathi: