पतधोरण जाहीर होण्याआधी शेअर बाजारात तेजी !

 

मुंबई | रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर होण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. जागतिक शेअर बाजारात संमिश्र संकेत असून आशियाई बाजारातूनही भारतीय शेअर बाजारासाठी फारसे चांगले संकेत दिसत नाहीत. मात्र, भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या टप्प्यात खरेदी असल्याचे दिसत आहे.

आज सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 122.24 अंकांनी वधारत 58,421.04 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांकात 41.65 अंकांची वाढ झाली. निफ्टी 17,423.65 अंकांवर व्यवहार करत होता. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 229 अंकांनी वधारत 58,528.76 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी निर्देशांक 53 अंकांनी वधारत 17,435.20 अंकांवर व्यवहार करत होता.

आज बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतरच्या पहिल्या 10 मिनिटात निफ्टी 17400 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 50 मधील 33 शेअरमध्ये तेजी दिसून आली. त्याशिवाय, इतर 17 शेअरमध्ये घसरण दिसून आली. बँक निफ्टीत सध्या 108 अंकांची उसळण दिसत असून 37863 अंकांवर व्यवहार करत आहे.

आज सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. तर, सहा शेअरमध्ये घसरण सुरू आहे. अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, एल अॅण्ड टी, एसबीआय, विप्रो, एचयूएल, डॉ. रेड्डीज, आयसीआयसीआय बँक, टायटन, टाटा स्टील, एशियन पेंट्स, इन्फोसिस आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रामध्ये तेजी दिसून येत आहे.

Team Global News Marathi: