परीक्षेत आता कॉपी करताना सापडला तर होणार या कायद्याखाली शिक्षा

 

मुंबई : विद्यार्थी वर्गासाठी एक मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत असून आता यापुढे परीक्षेत कुणी कॉपी करताना आढळला तर त्याची खैर नाही. कॉपी बहाद्दरांना यापुढे थेट जेलची हवा खावी लागणारं आहे. ऑनलाईन सत्र परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिले आहेत.

परीक्षेत कॉपी करण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात प्रचंड वाढलंय. मात्र या कॉपीबहाद्दरांना चांगलाच चाप लावण्यासाठी आता विद्यापीठांनी जालीम उपाय शोधून काढला आहे. कॉपी करणाऱ्यांवर विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिले आहेत.

आता सावित्रीबाई फुले विद्यपीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे कॉपी करणाऱ्या प्रकरणाला कुठेतरी ब्रेक लागण्याचे चिन्ह दिसून येतं असून कॉपी प्रकरणाला आळा बसु शकतो असे बोलले जात आहे.

Team Global News Marathi: