परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्र्यांनी केली ‘त्या’ फाईलवर स्वाक्षरी |

 

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचयव्हर १०० कोटी हप्ता वसुलीचा आरोप लगावून एकच खळबळु उडवून देणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी अधिक वाढताना दिसून येत आहे. त्यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या संदर्भात आज गृहविभाग आदेश जाहीर करतील अशीही माहिती समोर येतेय. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर पाच वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल असून त्यांचा तपास सुरू आहे. तसेच त्यांनी 200 दिवसांहून अधिक दिवस गृह विभागाला न कळवता परस्पर सुट्टी घेतली होती. त्या संदर्भातही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मिळतेय.

आता निलंबन करण्यात आलंय याच्या पुढची कारवाई थेट सेवेतून बडतर्फ असणार आहे. ड्युटीवर नसतानाही परमबीर सिंग यांच्याकडून सरकारी गाडीचा वापर परमबीर सिंग हे अचानक गायब झाले आणि अखेर २३४ दिवसांनी ते मुंबईत परतले. मुंबईत परतले परमबीर सिंग हे ड्युटीवर अद्यापही हजर नाहीयेत आणि असे असतानाही ते सरकारी गाडीचाच वापर करत आहेत. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर चौकशीचे आदेश दिल्याचं म्हटलं आहे.

Team Global News Marathi: