एका मुलीचा छळ करण्यासाठी ‘पप्पू’ सार्वजनिक पैशाचा वापर करत आहे – कंगना राणावत

एका मुलीचा छळ करण्यासाठी ‘पप्पू’ सार्वजनिक पैशाचा वापर करत आहे – कंगना रानौत

सिनेभिनेत्री कंगना रानौत आणि मुंबई मनपा वाद काही दिवसांपूर्वी खूप मोठ्या प्रमाणात गाजला होता. मुंबई मनपाने कंगना रानौत हिच्या मुंबईत स्थित ‘मणिकर्णिका’ कार्यालयावर बुलडोझर चालवला होता. मनपाकडून तिच्या कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाही करण्यात आली होती. पुढे या प्रकरणी कंगनाने कोर्टात न्याय मागत महानगर पालिका आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती.

मात्र आता या वादात बृहमुंबई महानगर पालिकेची बाजू मांडण्यासाठी अस्पी चिनाॅय या वकिलाला मानधनापोटी आतापर्यंत तब्बल ८२ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. अशी माहिती माहितीच्या अधिकारातून पुढे आली आहे. आत हाच मुद्धा पकडत सिनेअभिनेत्री कंगना रानौत हिने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा काम केले आहे.

यावरूनच आता कंगना रनौतने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये कंगना म्हणते की, ‘बीएमसीने माझे कार्यालय बेकायदेशीरपणे पाडण्यासाठी वकिलांवर आत्तापर्यंत ८२ लाख रुपये खर्च केले आहेत. एका मुलीचा छळ करण्यासाठी हे पप्पू सार्वजनिक पैशांचा वापर करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हटलं आहे.’

ग्लोबल न्युज नेटवर्क: