…पंतप्रधान मोदींच्या कृपेने पेट्रोल १५० रुपयांवरही जाईल, जयंत पाटलांचा खोचक टोला

 

देशात महागाई प्रचंड वाढली असून निवडणुका संपल्यावर पेट्रोल-डिझेलचे दर ही वाढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेमुळे सध्या पेट्रोल प्रति लिटर ११८ आणि डिझेलही शंभर रुपयांवर गेले आहे. पुढच्या काही दिवसांत १२५ रुपये, आणखी काही दिवसांनी १५० रुपये सुद्धा होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, महागाईची झळ सर्वसामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात बसत आहे, याचा गांभीर्याने विचार करत देशातील महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले. पण कर्नाटक किंवा अन्य राज्यापेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल महाग कसं? जो दुष्काळी कर पेट्रोल वर लावलाय तो अजून का कमी केला नाही या प्रश्नांना मात्र जयंत पाटील यांनी सोयीस्करित्या बगल दिली.

कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी एक उदाहरण दिलं. “क्रिकेटमध्ये वाडेकर इंग्लंडला जाऊन आले. त्यावेळी भारताचा दारुण पराभव झाला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्हाला 11 नाही तर 13 खेळाडूंविरोधात खेळायला लागलं. कारण दोन पंचदेखील आमच्या विरोधात होते. त्याच पद्धतीने केंद्र सरकारची ईडी आणि सीबीआय आमच्याविरोधात आहेत. तसाच प्रकार सध्या देशात चालू आहे,” असा टोला जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

Team Global News Marathi: