पंकजा मुंडे यांना देखील भाजपने मागे टाकले ; सुषमा अंधारेंची घणाघाती टीका

 

शिवसेनेसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार फोडून थेट भाजपसोबत सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेना पुन्ह उभी करण्यासाठी उद्धव ठाकरे आपल्या गटातील नेत्यासोबत मैदानात उतरले आहेत. यादरम्यान परभणी झालेत्या भाषणातून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाला धारेवर धरले.परभणी येथे उद्धव ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या कार्यक्रमात अंधारे बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजप पक्षावर सडकून टीका केली.

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव घेत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. पंकजा मुंडे यांना देखील भाजपने मागे टाकले आहे, असे अंधारे म्हणाल्या. भाजपच्या डोक्यात मनुवादी विचार आहेत. यामुळेच भाजपच्या मंत्रिमंडळात एकही महिलेचा समावेश नाही, असा घणाघातही त्यांनी केला.

जिच्या हातात पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी. पण भाजपचे विचार वेगळे आहेत. पंकजा मुंडे सारख्या कर्तुत्वान महिलेला जेव्हा भाजप मागे टाकते, तेव्हा लक्षात येते की भाजपचा विचार महिलेला मागे टाकणारा आहे. कारण मनुवादी विचार त्यांच्या डोक्यात आहे, अशा शब्दात अंधारे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Team Global News Marathi: