पंढरपूर पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून राम शिंदे यांना उमेदवारी ?

पंढरपूर : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीकडून पोटनिवडणुकीत कोणाची वर्णी लागणार याविषयी चर्चा सुरु असताना दुसरीकडे या जागेवर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांचा या जागेसाठी भाजपा पक्षनेतृत्व विचार करत आहे अशी माहिती समोर येत आहे.

आमदार भारत भालके यांचे आकस्मित निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांच्या जागी त्यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा मुलगा भगिरथ भालके यांनी उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. पण दुसरीकडे पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

तसेच दोन-तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरमध्ये बैठक घेतली. मात्र, त्यावेळी उमेदवारी जाहीर केली नाही. त्यानंतर दिल्लीत शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावाचीही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

भाजपकडून विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. असं असताना आता माजी मंत्री आणि कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांविरोधात पराभव स्वीकारावा लागलेले डॉ. राम शिंदे यांचंही नाव भाजपकडून पुढे केलं जात आहे.

Team Global News Marathi: