Sunday, August 14, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंढरपूर:  विठ्ठल साखर कारखान्यांवर अभिजित पाटलांचे एकहाती वर्चस्व; १८ वर्षानंतर सत्तांतर

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 7, 2022
in राजकारण
0
पंढरपूर:  विठ्ठल साखर कारखान्यांवर अभिजित पाटलांचे एकहाती वर्चस्व; १८ वर्षानंतर सत्तांतर
ADVERTISEMENT

पंढरपूर:  विठ्ठल साखर कारखान्यांवर अभिजित पाटलांचे एकहाती वर्चस्व; १८ वर्षानंतर सत्तांतर

पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये  भगीरथ व काळे गटाचे १८ वर्षाची सत्ता उलधवून टाकत  अभिजीत पाटील यांनी २१ पैकी २० जागा जिकंत निविर्वाद  वर्चस्व प्रस्तापित केले आहे. या निवडणुकीत वारसा सांगणाऱ्या युवराज पाटील व भगीरथ भालके या दोघांचाही धक्कादायक पराभव झाला आहे. अभिजीत पाटील यांच्या रुपाने एका युवा नेतृत्वाचा उदय झाला असून येणाऱ्या सर्व निवडणुका पुर्ण ताकतीने लढण्याचे संकेत त्यांनी दिले आहे.

या निवडणुकीत एकूण २३००२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये अभिजीत पाटील पॅनेलचे सर्वच उमेदवार एकाच दुसरा गट वगळता १ नंबरवर राहीले. तुंगत, मेंढापूर गटात युवराज पाटील यांची आघाडी होती. तर सरकोली, कासेगाव गटात भगीरथ भालके दोन नंबरवर राहीले. यामध्ये तब्बल ४५२२ मते अवैध मते ठरली याचा फटका नक्की कोणाला बसणार याची मथंन करण्यात पराभूत पॅनेल गुंतला होता. तर विजयानंतर अभिजीत पाटील यांनी पंढरपुर शहरातील प्रमुख मार्गावरुन विजयी मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला.

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून विठ्ठल कारखान्याची ओळख आहे. या कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी चांगलाच जोर लावला होता. सत्ताधाऱ्यांसाठी ही निवडणूक विरोधक असलेले अभिजित पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. कारखान्याच्या सहा ऊस उत्पादक गटातून 1677 मतांच्या आघाडीने 20 जागांवर विजय मिळवला. तर सत्ताधारी आघाडीला संस्था प्रतिनिधी मतदार संघातून समाधान काळे हे विजयी झाले आहेत. भालके- काळे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर युवराज पाटील गटाने चांगली लढत दिली मात्र त्यांना एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.

१८ वर्षानंतर विठ्ठल कारखान्यावर सत्तांतर

राष्ट्रवादी काँग्रेसचे  दिवंगत आमदार भारत भालके यांची गेल्या १८ वर्षापासून विठ्ठल कारखान्यावर सत्ता होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके हे कारखान्याचे अध्यक्ष झाले होते. नुकत्याच झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर आता झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. सलग दोन मोठया पराभवांना त्यांना सामोरे जावे लागले आहे, तर कारखान्याचे संस्थापक औदुंबर पाटील यांचे नातू युवराज पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे

विजयी झालेले उमेदवार…

– भाळवणी गट – धनंजय उत्तम काळे (८३२७ मते, वाडीकुरोली), साहेबराव श्रीरंग नागणे (८३१५ मते, रा. उपरी), कालिदास रघुनाथ पाटील (८१६५ मते,  रा. कौठाळी),

– करकंब गट – नवनाथ अंकुश नाईकनवरे ( ८५०० मते, रा. पटवर्धन कुरोली), दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे (७९३० मते, रा. जळोली), कालिदास शंकर साळुंखे ( ७८७७ मते, रा. खेडभोसे),

– मेंढापूर गट – जनक माणिक भोसले (८३०१ मते, रा. रोपळे बुद्रुक), दिनकर आदिनाथ चव्हाण (८०४० मते, रा. आढीव),

– तुंगत गट – अभिजीत धनंजय पाटील (८७४६ मते, रा. देगाव), प्रविण विक्रम कोळेकर (६८९३ मते, रा. गुरसाळे),

– सरकोली गट – संभाजी ज्ञानोबा भोसले (८४४१ मते, रा. सरकोली), सचिन सोपान वाघाटे (७८७५ मते, रा. आंबे),

– कासेगाव गट – सुरेश बाबा भुसे (८५२८ मते, रा. कासेगाव), बाळासाहेब चिंतामणी हाके (८२५५ मते, रा. कोर्टी), प्रेमलता बब्रुवाहन रोंगे (८१६२ मते, रा. कराड रोड गेंड वस्ती, पंढरपूर),

– अनुसूचीत जाती/जमाती मतदार संघ – सिताराम तायाप्पा गवळी (८६४३ मते, रा. कासेगाव),

– इतर मागासवर्ग मतदारसंघ – अशोक ज्ञानोबा जाधव (८६५४ मते, रा. फुलचिंचोली)

– महिला प्रतिनीधी मतरास संघ – कलावती महादेव खटके (८४३२ मते, रा. भोसे), सविता विठ्ठल रणदिवे (८१४६ मते, रा. तुंगत),

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

– विमुक्त जाती/भटक्या जमाती किंवा विशेष मागास वर्ग मतदारसंघ – सिध्देश्वर शंकर बंडगर (८६८४ मते, रा. होळे)

– उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था – समाधान वसंतराव काळे (६४ मते, रा. वाडीकुरोली)

ADVERTISEMENT
ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: अभिजित पाटीलकाळेपंढरपूरभालकेविठ्ठल साखर कारखाना
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

‘मुख्यमंत्रिपदात जादू असते, मग सोबतचेही सोडून का गेले?

Next Post

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी राम शिंदे आघाडीवर नगर जिल्ह्यात बळदेण्याचा पक्षाचा निर्णय

Next Post
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी राम शिंदे आघाडीवर नगर जिल्ह्यात बळदेण्याचा पक्षाचा निर्णय

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी राम शिंदे आघाडीवर नगर जिल्ह्यात बळदेण्याचा पक्षाचा निर्णय

Recent Posts

  • शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यघटनेचा अवमान; राष्ट्रवादीचा सर्वोच्च न्यायालयात दावा
  • कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया – चंद्रकांतदादा पाटील
  • शिंदे गटातील नाराज आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात?
  • ब्रासबॅण्डच्या सुरात तिरंगा यात्रा, भारतमातेच्या जयजयकारात प्रभात फेरी!
  • एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना या प्रकरणात मिळाली क्लीन चिट !

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group