पाकिस्तानचे लोक आपले विरोधी नाहीत, तेथील लोकांना शांतता हवी – शरद पवार

 

पाकिस्तानच्या सर्वसामान्य जनतेला शांतता हवी, मात्र काही लोक द्वेषाचं राजकारण करतात. पाकिस्तानची जनता आपले विरोधक नाही तर जे राजकारण करून लष्कराच्या मदतीने सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसेच तेच संघर्ष आणि द्वेष पसरवतात. बहुतांश लोक पाकिस्तानात शांतता राहावी या बाजूचे आहे असा माझा वैयक्तिक अनुभव आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

पुण्याच्या कोंढवा परिसरात झालेल्या ईद मिलन कार्यक्रमात शरद पवार सहभागी झाले होते. यावेळी पवारांनी भारत-पाकिस्तान यांच्या नात्यावर भाष्य केले. कुठल्याही नेत्याचं नाव न घेता शरद पवारांनी माजी पंतप्रधान इमरान खान यांचं कौतुक केले. पवार म्हणाले की, पाकिस्तानातील युवा नेता देशाला दिशा देण्याचं काम करत होता परंतु त्याला सत्तेतून बाहेर काढलं गेले असं त्यांनी सांगितले.

इतकेच नाही तर शेजारील राष्ट्र पाकिस्तानात ज्याठिकाणी तुमचे आणि माझे बांधव राहत आहेत. पाकिस्तानची सर्वसामान्य जनता भारताचा शत्रू नाही. तर काही लोक जे राजकारण करत आहेत आणि सैन्याच्या मदतीने सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करतायेत. ते संघर्षाच्या स्थितीत आहे. लोकांना शांतता हवी. कुठलाही धर्म द्वेष करण्यास शिकवत नाही. जाती-पाती धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात. परंतु आम्हाला द्वेष नाही तर विकास हवा आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: