जास्त बोललात तर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकू- नवाब मलिक

 

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी त्या क्रुझ पार्टीवर छापा मारला आणि आर्यन खानला ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले आहेत. एकीकडे आर्यन खानला जामीन मिळाला तर दुसरीकडे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या तसेच त्यांना चौकशीला सुद्धा सामोरे जावे लागले होते.

त्यातच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी रविवारी समीर वानखेडे यांच्या घरी जात भेट घेतली. तत्पूर्वी, वानखेडे यांनी शनिवारी अरुण हलदर यांची भेट घेऊन त्यांच्यावरील धर्मांतराच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. या बैठकीनंतर आयोगाचे उपाध्यक्ष म्हणाले होते की, जर कोणी अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्यावर जातीच्या आधारावर आरोप केले तर आयोग अशा प्रकरणी गप्प बसणार नाहीयावरूनच मलिक यांनी संताप व्यक्त केला आहे.

ज्या व्यक्तीला तुम्ही सामाजिक न्याय विभागाच्या पदावर बसवले आहे ती व्यक्ती विभागाचे अधिकार स्वतःकडे घेत आहेत. याची आम्ही राष्ट्रपतींकडे तसेच सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, ज्या व्यक्तीने बनावट प्रमाणपत्र बनवून एका मागासवर्गीयाचे अधिकार हिरावून घेतले. त्यांनी मला धमकी दिली आहे. जास्त बोललात तर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकू. ते जास्त बोलत आहेत. जी व्यक्ती दलित नाही त्यावरून मला घाबरवण्याचे काम करत आहात. सर्वानी मर्यादेत राहायला हवं. आपल्या पदाची प्रतिष्ठा राखायला हवी. त्यांचा अधिकार हिरावून घेऊ नये. आम्ही याची तक्रार करणार आहोत, असे नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

Team Global News Marathi: