उद्रेक: राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन; आज 31,855 नवे रुग्ण

ग्लोबल न्यूज – राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. देशात नव्या स्ट्रेनचे एकूण 771 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी महाराष्ट्र, केरळ व तेलंगणा राज्यात हे रुग्ण अधिक आहेत. काही रुग्णांमध्ये युकेचा तर, काही रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा स्ट्रेन आढळून आला आहे.

आजची रुग्णांची संख्या देखील चिंता वाढवणारी असून, आज दिवसभरात राज्यात तब्बल 31 हजार 855 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 22 लाख 62 हजार 593 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज दिवसभरात 13 हजार 098 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.21 टक्के एवढं झाले आहे.

 

सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून सध्या 2 लाख 47 हजार 299 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना मृतांची संख्या 53 हजार 684 एवढी झाली असून, आज दिवसभरात 95 जणांनी आपला जीव गमावला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.09 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात सध्या 12 लाख 68 हजार 094 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 13 हजार 499 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. देशात 10 जिल्ह्यात नव्यानं वाढ होणा-या कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यापैकी 9 जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अकोला व जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: