ऑनलाईन जुगारावर ठाकरे सरकार बंदी आणण्याच्या विचारात !

 

तरुणांच्या स्मार्टफोनवर सध्या ऑनलाईन जुगाराचा सुळसुळाट पाहायला मिळत असून या ऑनलाइन जुगाराची अनेक अभिनेते जाहिरात करताना दिसून येत आहेत. आज मोठ्या प्रमाणात तरुण या ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात सापडत आहेत. विद्यार्थी, नोकरदार आणि काही व्यावसायिकही ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेले आहेत.

अशातच नागपुरातील सायबर पोलिसांच्या ही बाब लक्षात आली आहे. काही तक्रारीसुद्धा त्यांच्यापर्यंत आल्या आहेत. पण कायद्यानं बंदी नसल्याने हा ऑनलाईन जुगार सर्रास सुरु आहे, यात दिवसेंदिवस तरुण पिढी अडकत चालली आहे. यातूनच तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे. या ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची मागणी आता जोर धरत आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची गरज व्यक्त केली आहे. याबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. “अनेक तरुण ऑनलाईन जुगाराच्या आहारीत गेले आहेत. पैसै हरल्यामुळे तरुणांमध्ये नैराश्यही येत आहे, काही जण तर आत्महत्येपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची मागणी सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनीही केली आहे.

Team Global News Marathi: