यशवंत जाधव यांच्यावर किरीट सोमैय्यांनी मनी लॉन्ड्रिंगचा आरोप

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांवर भाजपा नेते किरि सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप लगावले आहेत. त्यातच येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी आता थेट शिवसेनेचे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे.

यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केली असून त्या संबंधित आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. यशवंत जाधव यांची अवस्था चोर मचाये शोर अशी झाली आहे, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे. तसेच सोमवारपासून यशवंत जाधव यांच्या चौकशीला गती देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सोमैय्या यांनी सांगितले.

तसेच यावेळी त्यांनी मराठवाड्यातील चार नेत्यांचा घोटाळा उघड करणार असल्याचेही सोमैय्या यांनी सांगितले. मराठवाड्यातील चार नेत्यांनी तब्बल २० कोटी रुपये बिटकॉईनमध्ये गुंतवले आहेत, असे त्यांनी सांगितलं. बिटकॉईनच्या व्यवहाराची संपूर्ण माहिती उपलब्ध असल्याचेही सोमैय्या यांनी सांगितले. तसेच सोमवारी ईडी कार्यालयात जाणार असून या प्रकरणाची माहिती ईडी चेअरमन आणि केंद्रीय अर्थ खात्याला देणार आहे, असे किरीट सोमैय्या यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: