दिवाळीच्या पूर्वसंध्येला आईच्या आठवणीने शरद पवार गहिवरले; सोशल मीडियावर त्यांचे हे ‘पत्र’ होतय खूपच व्हयरल

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्याला आई शारदाबाई ला ‘बाई’ या नावाने हाक मारायचे. त्याच नावाने साद घालत.संसदीय राजकारणाची पन्नास वर्षे पूर्ण केलेल्या पवारांना लहानपणापासून आईकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्या शिदोरीवर त्यांनी राजकारणात देश पातळीवर घवघवीत यश मिळवले.दिवाळीच्या पूर्वसंध्येला शरद पवार यांनी सोशल मीडियावर एक पत्र लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

गेल्या वर्षभरातील दगदग, राजकारणाच्या पिचवर उभे ठाकलेले कडवे आव्हान, साताऱ्यात धोधो पाऊस अंगावर झेलत प्रचारसभेत केलेले भाषण, गेले काही महिन्यांपासून ओढवलेले करोना संसर्गाचे संकट या सर्वांबद्दल शरद पवार यांनी बाईंशी या पत्रातून संवाद साधला आहे. हे पत्र लिहिताना पवार काहीसे हळवे झाल्याचे पाहायला मिळाले.या पत्रात त्यांनी आई ने दिलेलं संस्कार, सर्व भावंडाना दिलेले शिक्षण व त्यांची आनंदाच्या क्षणी भासत असलेली उणीव आदी बाबींचा उहापोह करत त्यांच्या आठवणी तेवत ठेवल्या आहेत.

शरद पवारांचे पत्र जसेच्या तसे

प्रिय सौ.बाई
साष्टांग नमस्कार
पत्रास उशीर झालाम्हणून क्षमस्व!मागील वर्ष खूप धकाधकीचे गेले. एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आणि पाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुका यामुळे सगळं वातावरण ढवळून निघालं होतं. लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीला यश आलं नाही. पक्ष अडचणीत असताना काही जवळचे, काही.ज्येष्ठ सहकारी देखील सोडून गेले. काही महिन्यांतच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं. पण तुम्ही मला हार न मानता, खचून न जाता झुंजण्याचं बाळकडू दिलं आहे. मग खचून जाण्याचा प्रश्नच नव्हता.

 

मला चांगलं आठवतं. बैलानं मारल्यामुळे तुमचा एक पाय अधू झाला. पण तुम्ही नेटाने संसार केला आणि सार्वजनिक कामात देखील झोकून दिलं. ह्या प्रेरणेच्याबळावरच मी पुन्हा उभारी घेण्याचा निधरि केला. महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला.

हे करत असताना मला तरूणाईनं डोक्यावर घेतलं. मला नवा उत्साह मिळाला, मी साता-याच्या सभेत मुसळधार पाऊस अंगाखांधावर घेतला. तो पाऊस जनतेच्या मनात
झिरपला आणि मनांमधून व्यक्त झाला. महाराष्ट्रात नवीन समीकरणे तयार होऊन आपलं सरकार आलं. नवं सरकार जेव्हा शपथ घेत होतं तेव्हा माझ्या पहिल्या वहिल्या
निवडणुकीला अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही जे मादिर्शन केलं ते लक्षात होतं. राजकीय धामधुमी कमी झाली तसं कोरोना महामारीचं संकट ओढवलं. त्यातून अधाप दिलासा नाही पणवेळ काढून तुम्हाला पत्र लिहितोय,

बाई, तुमच्यात उपजतच नेतृत्वाने गुण होते.तुम्ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच १९३५ साली पहिल्या जिल्ला लोकल बॉडविर निवडून गेलात. लोकल
बोडविरील विविध जबाबदा-या पार पाडताना तुम्ही आपली वेगळी छाप उमटवली. अगदी तान्हं मूल कडेवर घेऊन, खडतर प्रवास करत तुम्ही बोउच्यिा बैठकांना जायचात.

कळत-नकळत हे सगळे संस्कार माझ्यावर झाले आणि मी सार्वजनिक जीवनात समाधानकारक कामगिरी करू शकलो.
बाई, तुमची विचारसरणी साम्यवादाला पोषक होती. मी मात्र गांधी-नेहरू- यशवंतराव चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेकडे ओढलो गेलो. तुम्ही तुमचे राजकीय विचार माझ्यावर लादले नाहीत. राजकीय मतभिन्नता असली तरी परस्पर सुसंवाद राहायला हवा ही शिकवण मला तुमच्याकडूनच मिळाली.

माझ्या पंच्चाहत्तरीच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे झालेल्या सत्कारप्रसंगी राष्ट्रपती, आजी-माजी प्रधानमंत्र्यांसहित भारतातील सर्वपक्षाचे प्रमुख भेदाभेद विसरून उपस्थित होते. हा अपूर्व सोहळा अशा सुसंवाद राखण्याच्या संस्काराचे फलित आहे, असे मी मानतो. त्या सत्कारप्रसंगी तुमचीच मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर दिसत होती.

बाई! कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी ह्या दोन्ही बाबी समान न्यायाने सांभाळत, सामान्यांसाठी अखंड काळ काम करत राहण्याचा आपण दिलेला सल्ला मी जतन करीत आहे. तुमच्या संस्काराने आम्ही सर्व भावंडे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो. आपले क्षेत्र स्वत:च्या आवडी-निवडीनुसार निवडायचे स्वातंत्र्य आपण दिले आणि ते देत असताना आमच्यावर तुमचे सतत लक्ष असायचे हे मला ठावूक आहे. ‘आम्ही पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणात लक्ष देतो की नाही, आमचे सवंगडी कोण आहेत, अन्य कोणत्या क्षेत्रात आम्ही रस घेतो’ हे तुम्ही कटाक्षाने पाहायचा.

आम्हा भांवडांसाठी तुम्ही घेत असलेले अपार कष्ट आमची प्रेरणा आहे. सर्वात थोरले बंधू वसंतराव कायद्याचे पदवीधर झाले. आप्पासाहेबांनी कृषी पदवी घेतली. अनंतरावांनी कला आणि शेती क्षेत्रात स्वत:ची ओळख तयार केली. बापूसाहेबांनी लंडनला बोटीने जाऊन तिथे नोकरी करत इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले. सूर्यकांतरावांनी बडोद्याला जाऊन सयाजीराव गायकवाड विद्यापीठात आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केले. धाकटा प्रताप इंजिनियर तर झालाच परंतु त्याने वृत्तपत्र व्यवसायात देखील लौकिक मिळवला आहे.

 

बाई, तुम्ही बहिणींना सुद्धा शिक्षण दिलंत. त्या आपापल्या संसारात भक्कमपणे उभ्या राहिल्या आहेत.

मी एक दिवस राज्याच्या प्रमुखाची जबाबदारी स्वीकारावी असं तुमचं स्वप्न होतं. पण मी राज्याचा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना तुम्ही नव्हतात. आप्पासाहेबांना आणि प्रतापरावांना पद्मश्री सम्नान मिळाला तेव्हाही नव्हतात. भारत सरकारने मला पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं त्यावेळी पुन्हा तुमच्या आठवणींनी मी हळवा झालो. चेहऱ्यावर लवलेश दाखवत नसलो तरी तुमची आठवण मनात आजही एक पोकळी निर्माण करते, मनात गहिवर आणते.

बाई, आज तुमची नातवंडं देखील निरनिराळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. तुम्हाला आम्हा भावंडा-नातवंडाकडे पाहून खूप-खूप समाधान वाटत असेल हे मात्र नक्की. दिवाळीत सर्व कुटुंबियांनी बारामतीला एकत्र यायचे हा तुमचा निर्णय आम्ही सगळे कटाक्षाने पाळत आहोत. मात्र ऐन दिवाळीत तुमची खूप उणीव भासते आहे. अधिक काही लिहित नाही. आपण व तीर्थस्वरूप आबा काळजी घ्या.

तुमचा शरद
गोविंदबाग,बारामती, पुणे.
दिनांक – १२ नोव्हेंबर, २०२०

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: