यशवंत जाधवांच्या डायरीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, ‘बरेच आपल्या आईला मातोश्री म्हणतात’

 

मुंबई | स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांच्याकडे प्राप्तिकर विभागाने केलेल्या चौकशीत १२ शेल कंपन्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीयांच्या ३३ ठिकाणी छापेमारी केली. यातून महत्त्वाची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एक डायरी प्राप्त झाली असून, यामध्ये अनेक संशयास्पद नोंदी सापडल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. यानंतर यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर भाष्य करताना, बरेच जण स्वतःच्या आईला मातोश्री म्हणतात, असे म्हटले आहे.

पवार म्हणाले की, तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करेल. अशा प्रकारच्या चौकशा ज्यावेळी होतात त्यावेळी तुम्ही विचारता. पण यामध्ये यशवंत जाधव यांनी मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो असे उत्तर दिले आहे. बरेच जण स्वतःच्या आईला मातोश्री म्हणतात. काही जण आई म्हणतात तर काही मातोश्री म्हणतात. ते स्वतः सांगत असताना तुम्हा त्याला अधिक उकळी देण्याचे काम का करत आहात, असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला आहे.

Team Global News Marathi: