भाजपा कार्यालयात महिलेवर लैंगिक अत्याचाराच आवाज दाबण्यासाठी महिला नगरसेविकाने मारहाण केल्याचा आरोप

 

मुंबईत भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सत्ताधारी आता विरोधकावरतूतून पडले आहे तसेच याच मुद्द्यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.आता एएनआयच्या वृत्तानुसार, महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या प्रकरणात महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचा आवाज दाबण्यासाठी भाजपा नगरसेविकांनी मारहाण केली असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. “भाजपाचे नेते महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. फडणवीस सरकारच्या काळातच महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले होते. दुसरीकडे देशपातळीवर भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. आत्ताची घटना त्यापेक्षाही गंभीर आहे.

तर भाजपाच्या महिला नेत्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात आणि दुसरीकडे त्यांच्या कार्यालयात विनयभंग होतो ही गंभीर बाब आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या महिलेने खासदार गोपाळ शेट्टी व आमदार सुनील राणे यांना पत्र लिहून मदत मागितली. मात्र त्यांनी न्याय दिला नाहीच उलट तेथील भाजपा नगरसेविकांनी महिलेला मारहाण केली. हे यांचं खऱं चरित्र आहे आणि महिला अत्याचारासंबंधी हीच यांची भूमिका आहे. त्यामुळे फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. भाजपाच्या कार्यालयातच महिला सुरक्षित नाहीत,” असं सचिन सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Team Global News Marathi: