राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, आज 782 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, आज 782 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

ग्लोबल न्यूज – राज्यात आज (शनिवारी) 782 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी एक रुग्ण ओमायक्रॉनचा आहे. डोंबिवली येथे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 33 वर्षीय इसमाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या कल्याण डोंबिवली येथील कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आलीय.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 38 हजार 071 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 86 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज 770 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.71 टक्के एवढा आहे.

 

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत घट झाली असून, सध्या 7 हजार 129 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजवर 1 लाख 41 हजार 149 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.

 

राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 79 हजार 460 रुग्ण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 914 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 59 लाख 63 हजार 184 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: