लिव्ह इन रिलेशनशिपच्या निर्णयावरुन संभाजी गुरुजींनी न्यायाधीशांवर साधला निशाणा

 

सांगली | शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुन्हा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर संभाजी भिडे यांनी टीका केली आहे. तसेच ठकरे सर्कावर घणाघाती टीका संभाजी बीड गुरुजींनी केली आहे. वाईनविक्रीचा निर्णय धर्मविरोधी असल्याचे भिडे यांनी म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे या निर्णयासंदर्भात लवकरच राज्यपालांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर नाईट लाईफ संकल्पनेवरही भिडे यांनी हल्लाबोल केला आहे. नाईट लाईफ म्हणजे सर्वनाश असल्याचे भिडे यांनी म्हटलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिपचा निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींवरही त्यांनी आगपाखड केली आहे.

या वक्तव्यामुळे संभाजी भिडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. लिव्ह इन रिलेशनशीप अयोग नाही, असं म्हणणाऱ्या न्यायालये देखील वैध नाहीत, अशा न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवले पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: