काश्मीरमधील पंडितांच्या होत आहेत, जवानांच्या हत्या सुरू आहेत.. पुन्हा राऊतांनी साधला मोदी सरकारवर निशाणा

 

मुंबई | बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत तर त्याचे पडसाद फक्त महाराष्ट्रात का उमटत आहेत? बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकात पडसाद का उमटत नाहीत? यामागे काय षडयंत्रं आहे, असा सवाल करतानाच जर खरोखरच हिंदू असुरक्षित आहे असं वाटत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत मोर्चा काढावा. मोदी-शहांना जाब विचारावा. आम्ही तुमच्या सोबत येऊ, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोहन भागवतांना हे आव्हान दिलं. काश्मीरमधील पंडितांच्या होत आहेत. जवानांच्या हत्या सुरू आहेत. त्या बांगालदेशातील घटनांपेक्षा भयंकर आहेत. त्यासाठी समस्त राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र यावं आणि दिल्लीत मोठा मोर्चा काढावा. तसेच हिंदू खरोखरच खतरे में है असं वाटत असेल तर सरसंघचालक मोहन भागवतांनी या मोर्चाचं नेतृत्व करावं, करणार आहात का नेतृत्व? हिंदूंबाबत आपल्या देशात काय चाललं आहे याचा जाब त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विचारावा, असं राऊत म्हणाले.

त्रिपुरात मोर्चा काढतात. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात. महाराष्ट्रात हिंसाचार होतो आणि रझा अकादमी म्हणते त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. मग हे कोण करत आहे? त्याचे उत्तर मिळायला हवं. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांचं अभिनंदन करतो. त्यांचं म्हणणं आहे की, त्रिपुरात काही घडलंच नाही. त्रिपुरात काही घडलंच नाही तरी मोर्चे निघत आहेत. त्रिपुरात काहीच घडलं नाही हे जर सत्य असेल तर मोर्चा आणि आंदोलनाचे आम्ही जे फोटो पाहतोय ते काय आहे? कशा करीता हा सर्व खेळ सुरू आहे? महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा आणि देशात तणाव निर्माण करण्याचा हा डाव आहे काय? असा सवाल राऊत यांनी केला. तसेच त्रिपुरात भाजपला तृणमूल काँग्रेसचं आव्हान उभं राहत आहे. त्यामुळे तर हे षडयंत्रं रचलं जात नाही ना? असा सवालही त्यांनी केला.

Team Global News Marathi: