जितेंद्र आव्हाड यांच्या अटक, किरीट सोमय्या यांनी ट्विट करून बातमी फोडली

 

ठाणे | राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना काल अनंत करमुसे प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची लगेचच दहा हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटकाही करण्यात आली. मोठ्या मंत्र्याला अटक झाली तरी कुणालाही त्याची बातमी आलेली नव्हती. तसेच कुठेही ब्रेकिंग न्यूज नव्हती. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केल्यानंतर ही बातमी फुटली.

आता समोर आलेल्या माहितीनुसार ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर त्यांना दुपारी कोर्टात हजर करण्यता आलं. मूळ एफआयआरमध्ये त्यांचं नाव नव्हतं. त्यांच्यावर अपहरण आणि मारहाणीचे आरोप करण्यात आले होते. कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडून देण्यात आलं.

आव्हाड पोलीस ठाण्यात आले. तासभर त्यांचा जबाब नोंदवला गेला. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात सुनावणी झाली आणि त्यांना दहा हजाराच्या जातमुचलक्यावर जामीनही मिळाला. तोपर्यंत कुणाला त्याची माहितीही नव्हती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, ही बातमी फुटली तीही केवळ राजकीय ने त्यामुळेच. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून आव्हाड यांच्या अटकेची माहिती दिली.

 

Team Global News Marathi: