ऑक्‍टोबर शेवटच्या आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता

 

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज भारताच्या तुलनेत विदेशात कोरोनाची काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेतला तर तिथे तीसरी आणि चौथी लाटदेखील आल्याचे निदर्शनास येत आहे. भारतातदेखील ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे भाकीत वर्तविण्यात येत असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यानी मत व्यक्त केले.

सृष्टी संस्थेतर्फे ‘करोना… आज, उद्या आणि पुढे? याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. भोंडवे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजूमदार हे होते. या कार्यक्रमात त्यांनी कोरोनाची परिस्थिती, तिसरी लाट तसेच किती काळ कोरोनाचा संसर्ग भारतात राहणार यावर भाष्य केले होते.

यावेळी डॉ. भोंडवे म्हणाले, करोनाचे म्युटेशन होऊन हा विषाणू दिवसेंदिवस मानवजाती समोर नव-नवीन आव्हांने उभी करीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून प्रत्येक देशांतील सरकार एकमेकांशी माहितीचे आदान-प्रदान करून समन्वयाने या महामारीचा सामना करत आहे. प्रतिबंधात्मक उपाय आणि प्रबोधन या दोन्ही पातळींवर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. लॉकडाऊन हा या महामारीवरील अंतीम उपाय होऊ शकत नाही.

Team Global News Marathi: