“ओबीसींना भटक्या विमुक्तांना आरक्षण देण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या पायही पडू”

 

राज्यात मराठा आणि OBC आरक्षणाचा मुद्धा तापत असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी याच मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु केले आहेत. त्यातच आता ओबीसींना भटक्या विमुक्तांना आरक्षण देण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू असं सांगताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायलाही तयार असल्याचं विधान केलं आहे.

त्याच प्रमाणे OBC आरक्षणासाठी विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना “आम्हाला मोदींकडे घेऊन चला” अशी सादच घातली आहे. भटक्या विमुक्त जाती-जमाती मुक्ती दिनाचे औचित्य साधून मंगळवारी सोलापुरात भटक्या विमुक्त व ओबीसींचा राज्यस्तरीय निर्धार मेळावा पार पडला. या कार्यक्रमात वडेट्टीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे पहिल्यांदाच एका मंचावर आल्यामुळे हे दोन नेते काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहील होत. त्याच राजकीय शेरेबाजी आणि टोलेबाजीने हा मेळावा चांगलाच गाजला. यावेळी भाजपाचे नेते, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई, आमदार प्रणिती शिंदे, माकपचे नेते नरसय्या आडम, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड, ओबीसी मेळाव्याचे राज्य समन्वयक रामराव वडकुते उपस्थित होते.

Team Global News Marathi: