ओबीसी आरक्षणासाठी कुणाच्याही पाया पडायला तयार’; छगन भुजबळांची प्रतिक्रिया

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार समीर भुजबळ सुद्धा उपस्थित होते. भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली.

तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं, अशी खुली ऑफर देत फडणवीसांनी केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरिकल डाटा मागावा असं छगन भुजबळ बुधवारी म्हणाले होते. आता फडणवीस भेटीवर खुद्द छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच आपण ओबीसी आरक्षणासाठी कोणाच्याही पाया पडायला तयार आहे. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत सर्वांनीच एकत्र या. सध्या यावर तोडगा काढणे महत्वाचं आहे. या प्रश्नावर एकत्र बसून चर्चा करणे गरजेचं आहे. सर्वांनी एकत्रित येत सामुहिक नेतृत्व करु, असं देखील भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: