नुपूर शर्माचे मुंडके धडावेगळे करणाऱ्याच्या नावावर संपूर्ण संपत्ती करणार, या व्यक्तीने केली घोषणा

 

नवी दिल्ली | भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. एकीकडे नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी होत असताना दुसरीकडे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळत आहेत. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केलेली असताना आता धमकीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांच्या अजमेर येथील दरगाहच्या खादिमने नुपूर शर्मा यांची हत्या करणाऱ्याला बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.

अजमेरच्या दरगाहचे खादिम हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी नुपूर शर्मा यांची हत्या करणाऱ्याला बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. याचा व्हिडीओचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नुपूर शर्मा यांनी केलेल्या विधानाचे पडसाद राजस्थानमधील उदयपूर आणि महाराष्ट्रातील अमरावती येथेही उमटले.

तसेच नुपूर शर्माला समर्थन दिल्याने उदयपूर येथील एका टेलरची तर अमरावती येथे एका केमिस्टची निर्घृण हत्या करण्यात आली. याच दरम्यान अजमेरच्या दरगाहच्या खादिमचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दोन-तीन दिवसांपूर्वीचा असून यात ते नुपूर शर्मा हिची हत्या करण्याबाबत बोलत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये सदर व्यक्ती आपले नाव सलमान असे सांगत असून रडत-रडत नुपूर शर्माचा बदला घेण्याची मागणी करत आहे. आई-वडिलांशी शपथ घेत तिला खुलेआम गोळी मारण्याचीही धमकी तो देत आहे. तसेच नुपूर शर्मा हिचे मुंडके धडावेगळे करणाऱ्याला आपली संपूर्ण संपत्ती, घर, पैसे देण्याचीही घोषणा आरोपीने केली आहे.

Team Global News Marathi: