नुपूर शर्मा विरोधात दिल्लीतील जामा मशिदीपासून प्रयागराजपर्यंत तीव्र निदर्शने

 

भाजपची माजी प्रवक्ता नुपूर शर्माच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर देशासह विदेशातूनही जोरदार विरोध होताना दिसत आहे.दरम्यान, गेल्या शुक्रवारी नमाजानंतर कानपूरमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. त्यानंतर आता आजी नमाजानंतर दिल्लीच्या जामा मशिदीबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. यावेळी त्यांनी पोस्टर दाखवत नुपूर शर्माविरोधात जोरदार घोषणा दिल्या. दिल्लीसह उत्तर प्रदेशातील प्रयागराजपासून सहारनपूरपर्यंत नमाजानंतर मुस्लिमांनी जोरदार विरोध प्रदर्शन केले.

पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वक्तव्यामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजी पसरली आहे. शुक्रवारी दिल्लीच्या जामा मशीद परिसरात नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदालविरोधात निदर्शने झाली. यावळी निदर्शकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदालच्या अटकेची मागणी केली. यासोबतच लोकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. याआधी गुरुवारी ओवेसींचा पक्ष एआयएमआयएमच्या कार्यकर्त्यांनी संसद पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली होती.

जामा मशिदीच्या शाही इमामाने सांगितले की, ‘जामा मशिदीबाहेर अशी निदर्शने होणार होती हे त्यांना माहीत नव्हते. आम्ही जामा मशिदीने आंदोलन पुकारले नव्हते. जामा मशीद चौकात म्हणजे गेट क्रमांक एकवर काही लोकांनी घोषणाबाजी सुरू केली. हे लोक कोण आहेत, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत,’ असे ते म्हणाले.

Team Global News Marathi: