आता महिलांनी घरकोंबड्या सरकारसारखं घरातच बसायचं का? भाजपच्या खासदाराची टीका

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विविध मुद्दयावरून विरोधक महाविकास आघाडीवर टीका करताना दिसून येत आहे. त्यातच राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्यातील अनेक भागात अंगावर काटा आणणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. या वाढत्या घटनांवरून खासदार रक्षा खडसे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

बीड, साकीनाका, परभणी, डोंबिवलीसह अनेक ठिकाणी झालेला निर्भयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडला नाही. महिला सुरक्षेच्या बाबतीत सरकारची बेफिकरी चीड आणणारी आहे, अशी टीका रक्षा खडसेंनी केली आहे. तर आता महिलांनी स्वसुरक्षेसाठी कायदा हाती घ्यायचा की घरकोंबड्या सरकारसारखं घरातच बसायचं? असा खोचक सवाल रक्षा खडसे यांनी उपस्थित केला आहे.

सरकारने दोन वर्षात फक्त निराशा केली. तत्कालीन गृहमत्र्यांनी महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणण्याच्या फक्त घोषणा केल्या पण कायदा काही अद्याप लागू झाला नाही, असा घणाघातही रक्षा खडसे यांनी केला आहे. महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारला सत्तेत राहाण्याचा काही एक अधिकार नाही, अशी टीका सुद्धा त्यांनी केली होती.

Team Global News Marathi: