आता ‘विना मास्क’ फिरणाऱ्यावर पोलीस ही करू शकणार दंडात्‍मक कारवाई ; वाचा सविस्तर-

आता ‘विना मास्क’ फिरणाऱ्यावर पोलीस ही करू शकणार दंडात्‍मक कारवाई ; वाचा सविस्तर-

बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या सर्व २४ विभागांच्‍या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक परिसरांमध्‍ये ‘विना मास्क’ वावरणा-या नागरिकांवर प्रत्‍येक वेळी, प्रत्‍येक ठिकाणी रुपये २००/- याप्रमाणे दंडात्‍मक कारवाई यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. यानुसार आजतागायत ४० हजार पेक्षा अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, यापोटी रुपये १ कोटी ५ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

वरीलनुसार करण्यात येत असलेली दंडात्मक कारवाई ही आता अधिक कठोरपणे राबविण्याचे निर्देश आजच्या बैठकी दरम्यान देण्यात आले. यासाठी प्रभाग स्तरीय नियोजन करण्याचे व त्यासाठी संबंधित नगरसेवकांचे सहकार्य घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यासाठी संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. यानुसार संबंधित संस्थांचे प्रतिनिधी व महापालिका कर्मचारी यांच्याद्वारे नियमितपणे कारवाई सुरु आहे. विना मास्क’ विषयक दंडात्मक कारवाईसाठी मुंबई पोलिस दल व वाहतूक पोलिस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई नियमितपणे करणार आहे.

मुंबई पोलिस दल व वाहतूक पोलिस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई सुयोग्यप्रकारे व्हावी, याकरिता महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या स्तरावर ‘संयुक्त कारवाई आराखडा’ तयार करण्याचे व त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: