आता पवारांनी लोकसभेसाठी २४ तास पावसात भिजावं, सुधीर मुनगंटीवारांचा टोला

 

मुंबई | २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातील सभा संपूर्ण राज्यभरात गाजली होती. आणि याच सभेमुळे राष्ट्रवादीला बळ मिळून राज्यात सत्ताबदल झाला असे जाणकार आणि राष्ट्रवादी कार्यकर्तेही म्हणतात. याचवरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

पवारांच्या पावसातल्या सभेने निवडूण आलो म्हणून सांगता, तर लोकसभेसाठी पवारांनी २४ तास पावसात भिजावं असा जोरदार टोला मुनगंटीवारांनी शरद पवारांना लगावला आहे. तसेच या निडणुकीत भाजपचे १०५ आमदार निवडूण येऊनही भाजप सत्तेपासून वंजित राहिली. मात्र लोकांनी त्यावेळी आम्हालाच निवडूण दिले होते, पण शिवसेनेने बेईमानी केल्याने आम्हाला विरोधी पक्षात बसावं लागलं असे म्हणत त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे.

२०१९ ला राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन भाजपमधे प्रवेश केला अन् साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणुक लागली. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ पवार साताऱ्यात आले होते. शरद पवार भाषणाला उभे राहिले आणि पावसाला सुरुवात झाली. मात्र तरीही पवारांनी माईक सोडलाच नाही. पडत्या पावसात पवारांनी मतदारांना साद घातली, आणि राष्ट्रवादी काँग्रेसला संपूर्ण राज्यात याचा फायदा झाला.

Team Global News Marathi: