आता जिल्हा बँकेत सुद्धा महाविकास आघाडी पॅनल

आता जिल्हा बँकेत सुद्धा महाविकास आघाडी पॅनल

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करून सरकार बनवले होते. हाच महाविकास आघाडीचा पॅटर्न यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसून येत आहे.

यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीची बैठक रेमंड रेस्ट हाऊस येथ ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत नवनिर्वाचित संचालकांची मते जाणून घेण्यात आली. पालकंमत्री आणि वनमंत्री संजय राठोड, काँग्रेस खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या उपस्थित बैठक झाली. यामध्ये सर्व नवनिर्वाचित संचालकांची मतं जाणून घेण्यात आली. महाविकास आघाडीच्या वतीने अध्यक्ष व दोन उपाध्यक्ष बनविण्याबाबत एकमत झाले.

प्रत्येक पक्षाने एक पद घेण्याबाबत चर्चा झाली असून यवतमाळमध्ये काँग्रेस मोठ्या भावाची भूमिका बजावणार आहे. काँग्रेसकडे अध्यक्षपद दिले जाणार असून एक उपाध्यक्षपद शिवसेनेला आणि एक राष्ट्रवादी कॉग्रेसला दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील सात जिल्हा बँकासह काही सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अहमदनगर, बीड , नांदेड, गडचिरोली, अकोला, औरंगाबाद आणि परभणी जिल्हा बँकाची निवडणूक लागणार आहे.

सोमवार ४ जानेवारी २०२१ पासून या संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संस्थांच्या निवडणूका स्थगित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी याबाबत माहिती दिली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: