धक्कादायक बातमी : यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, गौरी प्रशांत गडाख यांनी केली आत्महत्या

धक्कादायक बातमी : यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, गौरी प्रशांत गडाख यांनी केली आत्महत्या

अहमदनगर : एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी सौ. गौरी प्रशांत गडाख यांनी आत्महत्या केली आहे.

त्यांच्या आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलं नाही. घटनेची माहिती समजताच तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

अत्यंत धक्कादायक अशी ही घटना असून या घटनेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, गौरी गडाख यांनी नक्की कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.

नगर शहरातील यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरु आहे. गौरी प्रशांत गडाख (वय ३२) यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात साईदीप रुग्णालयाने तोफखाना पोलीस ठाण्यास माहिती कळवली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून याबाबत पोलीस तपास करत आहेत.

गौरी या यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत यांच्या पत्नी होत. तर राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयी होत्या. गौरी यांचे माहेर लोणी (ता. राहाता) येथील आहे.

त्या थेट राजकारणात सक्रीय नसल्या तरी पती प्रशांत यांनी स्थापन केलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्या कार्यरत होत्या.मागील वर्षी या पतिपत्नी ने कॉलेज च्या गॅदरिंग मध्ये रंग बरसे गाण्यावर केलेला डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: