तुम्ही दगडावर कितीही डोकं आपटलं, तरी भाजपाचा एकही आमदार फोडणं तुम्हाला जमायचं नाही”- सुधीर मुनगंटीवार

तुम्ही दगडावर कितीही डोकं आपटलं, तरी भाजपाचा एकही आमदार फोडणं तुम्हाला जमायचं नाही”- सुधीर मुनगंटीवार

ग्लोबल न्यूज: भाजपाच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असे भाकित केले होते. तसेच, भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसची काही नेतेमंडळी वर्षभर करताना दिसत आहेत. या मुद्द्यावरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना एक आव्हान दिले आहे.

अजित पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी “भाजपचे जे आमदार राष्ट्र्वादीत येतील त्यांना निवडणून आणण्यासाठी सेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्ही तिन्ही पक्ष मिळून एकच उमेवर देऊ आणि भाजपचा पराभव करू असे वक्तव्य अजित पवारांनी केले होते.

यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले की, ”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनेकदा सांगतात की भाजपाचे २० ते २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. तुमच्या सरकारला आता सत्तेवर येऊन १२ महिने झाले. तुम्ही अद्याप भाजपाचा एकही आमदार फोडू शकला नाहीत.

तुमच्यात जर ताकद असेल तर तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही दगडावर कितीही डोकं आपटलं, तरी भाजपाचा एकही आमदार फोडणं तुम्हाला जमायचं नाही”, असं थेट आव्हान त्यांनी अजित पवारांना दिले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: