पुण्यात लॉकडाऊन नाही पण कडक निर्बंध लागू केले; वाचा सविस्तर-

पुणे: पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन लावलेला नाही. मात्र जिल्ह्यातील कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६४ हजार ५९९ झाल्यामुळे कडक निर्बंध लागू झाले. संपूर्ण पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू झाले. नागरिकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पुुणे जिल्ह्यासाठी महत्त्वाचे कडक निर्बंध

३ एप्रिलपासून सात दिवस हॉटेल, रेस्टॉरंट, बार, सिनेमा थिएटर, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, सांस्कृतिक केंद्र, मॉल बंद

 

बंद असतानाच्या सात दिवसांत हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना होम डिलिव्हरीची परवानगी

 

अंत्यसंस्कारासाठी २० जणांची आणि विवाह सोहळ्यासाठी ५० जणांची मर्यादा लागू

 

अंत्यसंस्कार आणि विवाह सोडून इतर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी

 

रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट होणार

 

शाळा, कॉलेज, कोचिंग क्लास ३० एप्रिल पर्यंत बंद राहणार, ऑनलाइन शिक्षण सुरू राहील

 

दहावी आणि बारावीच्या ऑफलाइन परीक्षा कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन होणार

 

पुणे जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी कारणाशिवाय पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी

 

पुढील शुक्रवारी म्हणजे ९ एप्रिल रोजी निर्बंधांचा फेर आढावा घेणार

 

सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे ३ एप्रिलपासून सलग ७ दिवस बंद राहणार

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: