नितीन राऊत यांची मंत्री पदावरून होऊ शकते उचलबांगडी ? कोणाची लागणार वर्णी

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ऊर्जा मंत्री पदावर वर्णी लागू शकते. आज दिल्लीत काँग्रेस नेत्यांची‌ हायकमांडसोबत बैठक होत आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

आघाडी सरकारमध्ये सरकारमध्ये राजकीय भूकंपाची मालिका सुरुच आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा, मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी झाल्यानंतर अजून एक मोठी घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे. कारण ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या महतीनुसार नितीन राऊत यांच्याकडील ऊर्जा खात्याची जबाबदारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीज आज काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे बैठक होत आहेत.

लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीजबिलामुळे ग्राहक चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलात सरकारने सवलत द्यावी, असे निर्देश नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदी असताना दिले होते. शासनाने घरगुती ग्राहकांना दिलासा द्यावा, असंही पटोले यांनी म्हटले होते.

Team Global News Marathi: