मुंबईतील पावसाच्या पाण्यासाठी नितीन गडकरींचा नवा प्लॅन,मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र –

मुंबईतील पावसाच्या पाण्यासाठी नितीन गडकरींचा नवा प्लॅन,मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र –


मुंबई  : मुंबईत पडणाऱ्या पावसाचे पाणी जवळच्या उद्योगधंद्यासाठी वापरून ते पाणी पुनर्वापरात आणावे,असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.याबाबत त्यांनी पत्र लिहूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यावरचे आपले मत व्यक्त केले आहे.

मुंबईत दरवर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठते त्याचे शुद्धीकरण करून ते धरणांमध्ये साठवता येईल आणि जर हे पाणी चांगल्या पद्धतीने वाहून गेले तर बागायती शेतीलाही दिलासा मिळणार आहे.मुंबईचे रस्ते, वाहतूक, सांडपाणी,पुराच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सखोल विचार करून यावर मोठी योजना बनविण्याची गरज आहे. त्यासाठी गरज पडली तर इतर देशातील सल्लागाराची मदत घेऊन असे त्यांनी म्हटले आहे.

या पत्राच्या प्रती त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना पाठविल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: