नितेश राणेंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा जोरदार दौरा

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीय महाविकास आघाडीवर विशेष करून ठाकरे कुटुंबियांवर टीका करताना दिसून आले आहेत विविध मुद्दयावरून राणे कुटुंबीयांनी महाविकास आघाडीला अडचणीत आणायचा पुरेपूर प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी थेट वारली मतदार संघात अर्थात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता आता त्या पाठोपाठ मंत्री आदित्याठाकरे नितेश राणेंच्या मतदार संघाचा दौरा करणार आहे.

कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे २८ ते ३० मार्चपासून कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे सकाळी चिपी विमानतळावर लॅन्ड होतील. यानंतर ते मालवण जेट्टीवर पाहणी करतील. मग कुणकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन देवगड मतदारसंघात म्हणजे नितेश राणेंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे सभा घेतील. देवगड नगरपंचायतीत शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

थेट राणेंच्या बालेकिल्ल्यात घुसून आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करतील. विधानभवनातलं म्यॉव म्यॉव प्रकरण असेल किंवा दिशा सालियन प्रकरण, विविध प्रकरणात राणे कुटुंबियांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. आता त्यांच्याच मतदारसंघात दाखल होत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे तसेच आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याने कोकणातील राजकारण पुहा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Global News Marathi: