निष्ठावंत शिवसैनिकाने शिंदे गटाचा डाव उधळला; सदस्य नोंदणी थांबवली

 

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात शिंदे गटाच्या बेसावध शिवसैनिकांवर हल्ले केल्याचे प्रकरण ताजे असतानाच ठाकरे गटाची सदस्य नोंदणी रोखण्याचा प्रयत्नही मिंधे गटाने केला.मात्र निष्ठावंत शिवसैनिक प्रतिक राणे मिंधे गटाला सामोरा गेला आणि त्यांना खडेबोल सुनावले . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या वागळे परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विभागप्रमुख प्रतीक राणे हा शिवसेनेच्या सदस्य नोंदणीचे काम करत होता.

यावेळी मिंधे गटाचा माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांचा मुलगा यज्ञेश भोईर तेथे आला. त्याने प्रतीक राणे याला इथे ‘सदस्य नोंदणी का करतो? असे सवाल विचारत नोंदणी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र निधड्या छातीचा निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या प्रतिक राणे यांनी समोर येत शिंदे गटातील कार्यकर्त्यांना चांगलाच धडा शिकवला त्यामुळे काही काळापुरते तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

‘कोरोना संकटात एकनाथ शिंदे इथे आले’, असे मिंधे गटाच्या भोईर याने सांगताच निष्ठावंत प्रतिक राणेनेही त्याची बोलती बंद करणारे उत्तर दिले. ‘होय, त्यांना आम्ही शिवसेनेने निवडून दिले आहे. त्यांनी काम करायलाच हवे. ते आमच्या शिवसेना पक्षातून निवडून आले होते, म्हणून काम करत होते. त्यामुळे शिवसेनेची सदस्य नोंदणी करण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही, असे राणे म्हणाले.

Team Global News Marathi: